संस्कृती,प्रकृती आणि विकृती

खर म्हणजे हा स्वतंत्र पोस्ट नाही. महेंद्रजींच्या नव्या पोस्टची comment आहे.पण जरा सविस्तर लिहावेसे वाट्ल्याने पोस्ट टाकत आहे.

महेंद्र्जीनी या पोस्टमधे ईंटरनेट्च्या दुष्परिणामांची चर्चा केली आहे.हा विषय इतक्या मर्यादित परिघात हाताळता येणारा नाही.या समस्येचे नीट आकलन होण्यासाठी आपल्या बदलेल्या समग्र जीवनशैलीचाच विचार करावा लागेल.मला सुचणारा उपाय आयुर्वेदिक पद्धतीचा असल्याने वेळ खाउ पण कायमस्वरुपी रोग बरा करणारा आहे.रोगाच कारण बाह्य गोष्टीत(साधनांची अतिरिक्त उपलब्धता) शोधण्यापेक्षा रुग्णाची रोग प्रतिकारक शक्ति वाढवण्यावर माझा भर आहे.कारण बाह्य कारण बद्लत जातील तशी नवनवीन औषध शोधावी लागतील.

इंटरनेट्मुळे पसरणारया विकृतीचा विचार करता.मुलांमधे चांगल्या वाईटाचा विचार करण्याची म्हणजेच सद्सदविवेक बुध्दीचा विकास व्हावा म्हणून आपण  काय प्रयत्न करतो?त्यांच्या समोर अशी कोणती मोजपट्टी ठेवतो ज्यामुळे मुलांना संस्कृती आणि विकृतीमधे फरक करता येइल जेणे करुन पालकांना watchdogचे काम कराव लागणार नाही.मला कुठेतरी वाचलेल आठवतेय.

समजा तुम्हाला भुक लागली आणि तुम्ही अन्न घेतलत तर ती प्रकृती झाली.तुम्ही भुकेले असताना दुसर्‍या भुकेल्या जीवाला तुमच्या कडील अन्न देउ केलत तर ती संस्कृती होय.आणि तुमच पोट भरलेल असताना दुसर्‍याच अन्न हिसकावुन घेण म्हणजे विकृती होय.

दुसरी मह्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनातील आनंद देणार्‍या विवीध गोष्टींची त्याना ओळख करुन देणे.उदा. साहीत्य ,संगीत,नाट्क ,भट्कंती ,छायाचित्रण आदि .लहान असल्यापासुन आपणच त्याना मार्कांच्या शर्यतीत पळवतो.आजच शिक्षण हे फक्त दिवसाच्या आठ तासाच शिक्षण आहे त्यामुळे इतर वेळ कस जगाव ? व का  जगाव? हे आपल्यालाच त्याना शिकवाव लागेल .दुर्दैवाने याचे ट्युशन क्लासेस  चाटे घेत नाहीत.नाहीतर अशी मुल एकांगी,आणि मानसिक द्रुष्ट्या अपंग बनतात.अशा विकृतींना बळी पडतात.छोट्याछोट्या अपयशाने हतबल होताना दीसतात.

Advertisements

आय .पी. एल.,मोदी आणि कं. प्रायव्हेट लि.

   सानियाच्या लग्नानंतर आपल्या देशासमोरच्या सर्व समस्या संपल्यात जमा होत्या.त्यामुळे आता प्रसार माध्यमांच कस होणार? अशी चिंता पडली असताना आपल्या मोदीभाऊंनी हि समस्या तात्काळ सोडवली.Twitter वर त्यानी केलेल्या छोट्या टिवटिव ने सगळा देश ढवळून निघाला.आणि प्रसारमाध्यमे पुन्हा उत्साहात आली.प्रमुख राजकिय पक्षांचे प्रवक्ते त्याना प्रतिक्रीया देण्यासाठी सरसावून बसले.निखील वागळे,राज ठाकरे आदि मंडळी पुन्हा फ़ॊर्मात आली.आणि लोक नव्या घोट्याळ्याची चर्चा करु लागले.

एक बर असत आपल्याकडे उघडकीस आलेला प्रत्येक घोटाळा हा आता पर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असतो.(खर तर मोठे घोटाळे कधी उघडकीस येत नाहीत).निदान या विषयात तरी आपला आलेख चढता आहे.ह्यानिमित्ताने दाखवल्या जाणाऱ्या तोडु बातम्या(breaking news),चर्चा, वर्तमानपत्रातील लेख यामाध्यमातुन जितकी माहीती मिळाली

त्यामधुन माझा या माणसाबद्द्लचा आदर वाढत गेला.

ललित कुमार मोदी हयांची पार्श्वभुमी हि उद्योगपती घराण्याची आहे.Modienterprises हि १.५बिलीयन डॊलर कंपनी त्यांच्य कुटुंबाची आहे.Godfrey philips ह्या तंबाखुच्या क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य कंपनीचे ते संचालक आहेत.राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या मदतीने ते राजस्थान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले.या नेमणुकीने त्याना राष्ट्रीय बोर्डात स्थान दिले.२००५ मधील शरद पवार आणि जगमोहन दालमिया यांच्या ICCच्या निवड्णूकी दरम्यान उभ्या राहिलेल्या वादात ललित मोदी हे नाव चर्चेतआले.ICCच्या सर्वात कमी वयाच्या उपाध्यक्षांमधे मोदींची गणना होते.

हा IPL घोटाळा आहे तरी किती मोठा? खरच हा घोटाळा आहे का? यात किती आणि कोण कोण सह्भागी आहेत. हे जाणुन घेण मोठ रंजक असणार आहे. हा सगळा प्रकार तसा सामान्य माणसाच्या आकलना पलिकड्चा आहे.पाच शुन्यांपलिकड्चे हिशोब नाहितरी सामान्य माणसाला (त्यातुनही मराठी माणसाला )कमीच कळतात.

पण सर्वसामान्यपणे मला या विषयात काही फार जगावेगळ घडलय अस वाटत नाही.उदा.

)राज कारण्यानी आपल्या पदाचा गैरवापर करणे……

याच आरोपावरुन जर कुणाला राजिनामा द्यावा लागत असेल.तर भारतात सरपंच पदासाठीसुद्धा लायक उमेदवार मिळणार नाही.(सरपंच कशाला ,गैरवापराची शक्यता नसेल तर सरकारी खात्यात चपराशी सुद्धा होणार नाही).

सरपंच नगरसेवक आणि कंत्राटदारांचे लागेबांधे जगजाहिर आहेत.जेवढ मोठ पद तेवढा गैरवापर अधिक.साध्या नगरसेवक पदाच्या निवड्णुकीचा वैयक्तिक खर्च कोटिच्या घरात जातो म्हणतात.हे पैसे काय आभळातुन पडतात.शेवटी returns on investment म्हणुन काही असते की नाही.हा आरोप जेंव्हा राजकारणी मंडळी एकामेकावर संसदेत करतात तेंव्हा ‘comedy circus ‘ बघण्याचा आनंद होतो.राजकारण्यानाच कशाला बदनाम करायच,आपणही तथाकथित सर्वसामान्य जेंव्हा एखाद काम कींवा एखादी वस्तु रांग मोडुन अथवा सवलतीत,मीत्राच्या अथवा नातेवाईकाच्या ओळखीने दुसऱ्याचा ह्क्क व क्रम डावलून मिळवणे म्हणजे अधिकारचा गैरवापरच.तुमच्या ओळखी मोठ्या नाहित हा राजकारण्यंचा अपराध नाही . बरोबर ना…..

बरेच दिवसांनी…..

खरच आहे .नविन संकल्प करण सोप आहे.पण सातत्य टिकवण महाकठिण. आळ्शीपणा झाकण्यासाठी मग कारणही भरपूर असतात.ती कारण सांगण्यासाठि तरी पोस्ट लिहावा.म्हणून आज सुरवात केली.माझा पाय बरा होता होता रहिल्यामुळे मला मुंबईला प्रस्थान करणे भाग पडले.नविन डॊक्टरांकडे प्रथमपासुन ट्रिट्मेंट्ला प्रारंभ झाला.या अस्थिसंसर्गाने फार त्रास दिला .गेल वर्ष सव्वा वर्ष आजारपणात गेल.अजून किमान ६ महिने जातील असा डॉक्टरांचा कयास आहे.शारीरिक व्याधीचि काळजी डॉक्टर घेतील.पण मानसीक आरोग्य टिकवण व डिप्रेशन येवू न देण हे माझ मलाच कराव लागणार आहे.

त्यासाठी रिकामा वेळ सत्कारणी लावण्याचे मार्ग शोधतोय.खर तर रिकामा वेळ्च राहु नये म्हणुन प्रयत्न करतोय कारण म्ह्ट्लच आहे.’ empty mind is devils workshop’ .रिकाम राहील तर भलभलते विचार मनात येतात.भविष्याची चिन्ता मन पोखरुन काढते.या सगळ्याचा उपयोग काही नाही. मधले काही दिवस फार कंटाळ्वाणे गेले.संदिप खरेच्या ’कंटाळ्याचाही आता कंटाळा येतो’ या कवितेचा अनुभव पुरेपूर घेतला.आता मात्र या सगळ्यातुन बाहेर पडायचे ठरवले आहे. हि पोस्ट हा त्यातलाच एक प्रयत्न. बघु कस जमतय ते.

पडू आजारी मज मौज वाटे भारी

मागील वर्षाच्या सुरवाती पर्यंत आमच्य मनात या ओळी नेहमी येत.रुग्णालयावीषयी कायम एक प्रकारचे सुप्त आकर्षण आमच्य मनात राहिले आहे.लहानपणापासुन वर्षाकाठी एका दिवसाच्या सर्दीतापा व्यतीरीक्तकसलेही आजारपण नसणार्‍या आमच्यासरख्यासाठी रुग्णालयाचे आकर्षण वीचीत्र वाटलॆ तरी अस्वाभवीक नाही.
आप्तजन आपली काळजी घॆतायतात हि भावनाही सुखकारक असते.
फ़ेब्रुवारीच्या ६ तारीखला देवाने आमच्या ह्या इच्छेला तथास्तु  म्हटले आणि एका अपघाताचे निमित्त होऊन आम्ही गोव्यातील सरकारी इस्पितळात दाखल झालो.पहिले ४ दिवस बेशुद्धीतच गेले.नंतर मात्र हळुह्ळु परीस्थितीचे भान येऊ लागले.इथे बराच काळ मुक्काम असणार हे ही लक्षात आल.नेहमीच्या सवयीप्रमाणे आमचा जनसंपर्क सुरु झाला.
खाजगी रुग्णालयात सहसा न येणारे अनुभव सरकारी रुग्णालयात येतात.लोक अनुभव मिळवण्यासाठी प्रवास करतात.मला एका ठिकाणी बसुन इतके अनुभव मिळाले.
दुनियामे कितने गम है।मेरा गम कितना कम है। या ओळिंचा अर्थ इथेच खरा कळतो.प्रत्येक बेड एक स्वतंत्र कथा असते.या ४ महिन्याच्या वास्तव्यात मी अशा अनेक कथा अनुभवल्या. मानवी स्वभावाचेअनेकवीध कंगोरे समजले.
सर्वच काहि करुण किंवा दुःखी नव्ह्ते.काही विनोदी,romamtic सुध्दा होते.खर म्हणजे भरताच्या नाट्यशास्त्रातील सर्व रस मला इथे दिसले.
आगामी काहि लेखामधुन असेच काही अनुभव आपणा सर्वांबरोबर share करायच ठरवल आहे.बघु कस जमतय ते.
कार्य सिध्दिस नेण्यास श्री समर्थ आहेतच.आपले मार्गदर्शनही प्रार्थनिय आहे.
शुभम भवतु।

प्रथम तुला वंदीतो

गणाधिश जो ईश सर्वा गुणांचा ॥

मुळारंभ आरंभ तो र्निगूणाचा ॥

नमु शारदा मुळ चत्वार वाचा ॥

गमु पंथ आनंद या राघवाचा ॥