राष्ट्र

we the people

भारतीय प्रजासत्ताक आज 60 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. भारतीय राज्यघटनेसही 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने तयार केलेली राज्यघटना दोन वर्षे, 11 महिने, 18 दिवसांनंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी अस्तित्वात आली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यघटनेची ही ठळक वैशिष्ट्ये…

* 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना अस्तित्वात.
* आतापर्यंत 94 घटनादुरुस्ती.
* उद्देशिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे शब्द 42 वी घटनादुरुस्ती करून समाविष्ट करण्यात आले.
* उद्देशिकेत राष्ट्राची एकता व एकात्मता हे शब्दही 42 वीघटनादुरुस्ती करून समाविष्ट करण्यात आले.

महत्त्वपूर्ण दुरुस्ती
* 1 मार्च 1985 : पक्षांतरबंदी
* 28 मार्च 1989 : मतदानाच्या अधिकाराचे वय 21 वरून 18 वर.
* 12 डिसेंबर 2002 : सहा ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षणाचा अधिकार.
* 1 जानेवारी 2004 : मंत्रिमंडळाचा आकार लोकनियुक्त सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15 टक्के करण्याचा निर्णय.
* 20 जानेवारी 2006 : इतर मागासवर्गीयांना सरकारी; तसेच खासगी शिक्षण संस्थेमध्ये आरक्षण.

मूलभूत हक्क
* समानतेचा हक्क : कायद्यापुढे सर्व समान. धर्म, जात लिंग, जन्मस्थान या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करता येणार नाही.
* राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती यामध्ये सर्वांना समान संधी.
* भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही.
* राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय लाभाच्या पदावरील व्यक्ती परकीय देशाकडून किताब स्वीकारणार नाही.

स्वातंत्र्याचा हक्क
* भाषण, अभिव्यक्ती, शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचा, अधिसंघ वा संघ बनविण्याचा, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचा वा स्थायिक होण्याचा, कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालविण्याचा हक्क.
* शिक्षणाचा हक्क : वय 6 ते 14 वयाच्या बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद (2003 मध्ये 86 वी सुधारणा).
* वेठबिगारी, बालकांना कामाला ठेवण्यास मनाई : 14 वर्षांखालील बालकांना कामावर ठेवण्यास मनाई.
* सदसद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार.

सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क
* भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहण्याचा, आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी वा संस्कृती असेल त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s