संस्कृती,प्रकृती आणि विकृती

खर म्हणजे हा स्वतंत्र पोस्ट नाही. महेंद्रजींच्या नव्या पोस्टची comment आहे.पण जरा सविस्तर लिहावेसे वाट्ल्याने पोस्ट टाकत आहे.

महेंद्र्जीनी या पोस्टमधे ईंटरनेट्च्या दुष्परिणामांची चर्चा केली आहे.हा विषय इतक्या मर्यादित परिघात हाताळता येणारा नाही.या समस्येचे नीट आकलन होण्यासाठी आपल्या बदलेल्या समग्र जीवनशैलीचाच विचार करावा लागेल.मला सुचणारा उपाय आयुर्वेदिक पद्धतीचा असल्याने वेळ खाउ पण कायमस्वरुपी रोग बरा करणारा आहे.रोगाच कारण बाह्य गोष्टीत(साधनांची अतिरिक्त उपलब्धता) शोधण्यापेक्षा रुग्णाची रोग प्रतिकारक शक्ति वाढवण्यावर माझा भर आहे.कारण बाह्य कारण बद्लत जातील तशी नवनवीन औषध शोधावी लागतील.

इंटरनेट्मुळे पसरणारया विकृतीचा विचार करता.मुलांमधे चांगल्या वाईटाचा विचार करण्याची म्हणजेच सद्सदविवेक बुध्दीचा विकास व्हावा म्हणून आपण  काय प्रयत्न करतो?त्यांच्या समोर अशी कोणती मोजपट्टी ठेवतो ज्यामुळे मुलांना संस्कृती आणि विकृतीमधे फरक करता येइल जेणे करुन पालकांना watchdogचे काम कराव लागणार नाही.मला कुठेतरी वाचलेल आठवतेय.

समजा तुम्हाला भुक लागली आणि तुम्ही अन्न घेतलत तर ती प्रकृती झाली.तुम्ही भुकेले असताना दुसर्‍या भुकेल्या जीवाला तुमच्या कडील अन्न देउ केलत तर ती संस्कृती होय.आणि तुमच पोट भरलेल असताना दुसर्‍याच अन्न हिसकावुन घेण म्हणजे विकृती होय.

दुसरी मह्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनातील आनंद देणार्‍या विवीध गोष्टींची त्याना ओळख करुन देणे.उदा. साहीत्य ,संगीत,नाट्क ,भट्कंती ,छायाचित्रण आदि .लहान असल्यापासुन आपणच त्याना मार्कांच्या शर्यतीत पळवतो.आजच शिक्षण हे फक्त दिवसाच्या आठ तासाच शिक्षण आहे त्यामुळे इतर वेळ कस जगाव ? व का  जगाव? हे आपल्यालाच त्याना शिकवाव लागेल .दुर्दैवाने याचे ट्युशन क्लासेस  चाटे घेत नाहीत.नाहीतर अशी मुल एकांगी,आणि मानसिक द्रुष्ट्या अपंग बनतात.अशा विकृतींना बळी पडतात.छोट्याछोट्या अपयशाने हतबल होताना दीसतात.

Advertisements