संस्कृती,प्रकृती आणि विकृती

खर म्हणजे हा स्वतंत्र पोस्ट नाही. महेंद्रजींच्या नव्या पोस्टची comment आहे.पण जरा सविस्तर लिहावेसे वाट्ल्याने पोस्ट टाकत आहे.

महेंद्र्जीनी या पोस्टमधे ईंटरनेट्च्या दुष्परिणामांची चर्चा केली आहे.हा विषय इतक्या मर्यादित परिघात हाताळता येणारा नाही.या समस्येचे नीट आकलन होण्यासाठी आपल्या बदलेल्या समग्र जीवनशैलीचाच विचार करावा लागेल.मला सुचणारा उपाय आयुर्वेदिक पद्धतीचा असल्याने वेळ खाउ पण कायमस्वरुपी रोग बरा करणारा आहे.रोगाच कारण बाह्य गोष्टीत(साधनांची अतिरिक्त उपलब्धता) शोधण्यापेक्षा रुग्णाची रोग प्रतिकारक शक्ति वाढवण्यावर माझा भर आहे.कारण बाह्य कारण बद्लत जातील तशी नवनवीन औषध शोधावी लागतील.

इंटरनेट्मुळे पसरणारया विकृतीचा विचार करता.मुलांमधे चांगल्या वाईटाचा विचार करण्याची म्हणजेच सद्सदविवेक बुध्दीचा विकास व्हावा म्हणून आपण  काय प्रयत्न करतो?त्यांच्या समोर अशी कोणती मोजपट्टी ठेवतो ज्यामुळे मुलांना संस्कृती आणि विकृतीमधे फरक करता येइल जेणे करुन पालकांना watchdogचे काम कराव लागणार नाही.मला कुठेतरी वाचलेल आठवतेय.

समजा तुम्हाला भुक लागली आणि तुम्ही अन्न घेतलत तर ती प्रकृती झाली.तुम्ही भुकेले असताना दुसर्‍या भुकेल्या जीवाला तुमच्या कडील अन्न देउ केलत तर ती संस्कृती होय.आणि तुमच पोट भरलेल असताना दुसर्‍याच अन्न हिसकावुन घेण म्हणजे विकृती होय.

दुसरी मह्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनातील आनंद देणार्‍या विवीध गोष्टींची त्याना ओळख करुन देणे.उदा. साहीत्य ,संगीत,नाट्क ,भट्कंती ,छायाचित्रण आदि .लहान असल्यापासुन आपणच त्याना मार्कांच्या शर्यतीत पळवतो.आजच शिक्षण हे फक्त दिवसाच्या आठ तासाच शिक्षण आहे त्यामुळे इतर वेळ कस जगाव ? व का  जगाव? हे आपल्यालाच त्याना शिकवाव लागेल .दुर्दैवाने याचे ट्युशन क्लासेस  चाटे घेत नाहीत.नाहीतर अशी मुल एकांगी,आणि मानसिक द्रुष्ट्या अपंग बनतात.अशा विकृतींना बळी पडतात.छोट्याछोट्या अपयशाने हतबल होताना दीसतात.

Advertisements

बरेच दिवसांनी…..

खरच आहे .नविन संकल्प करण सोप आहे.पण सातत्य टिकवण महाकठिण. आळ्शीपणा झाकण्यासाठी मग कारणही भरपूर असतात.ती कारण सांगण्यासाठि तरी पोस्ट लिहावा.म्हणून आज सुरवात केली.माझा पाय बरा होता होता रहिल्यामुळे मला मुंबईला प्रस्थान करणे भाग पडले.नविन डॊक्टरांकडे प्रथमपासुन ट्रिट्मेंट्ला प्रारंभ झाला.या अस्थिसंसर्गाने फार त्रास दिला .गेल वर्ष सव्वा वर्ष आजारपणात गेल.अजून किमान ६ महिने जातील असा डॉक्टरांचा कयास आहे.शारीरिक व्याधीचि काळजी डॉक्टर घेतील.पण मानसीक आरोग्य टिकवण व डिप्रेशन येवू न देण हे माझ मलाच कराव लागणार आहे.

त्यासाठी रिकामा वेळ सत्कारणी लावण्याचे मार्ग शोधतोय.खर तर रिकामा वेळ्च राहु नये म्हणुन प्रयत्न करतोय कारण म्ह्ट्लच आहे.’ empty mind is devils workshop’ .रिकाम राहील तर भलभलते विचार मनात येतात.भविष्याची चिन्ता मन पोखरुन काढते.या सगळ्याचा उपयोग काही नाही. मधले काही दिवस फार कंटाळ्वाणे गेले.संदिप खरेच्या ’कंटाळ्याचाही आता कंटाळा येतो’ या कवितेचा अनुभव पुरेपूर घेतला.आता मात्र या सगळ्यातुन बाहेर पडायचे ठरवले आहे. हि पोस्ट हा त्यातलाच एक प्रयत्न. बघु कस जमतय ते.

पडू आजारी मज मौज वाटे भारी

मागील वर्षाच्या सुरवाती पर्यंत आमच्य मनात या ओळी नेहमी येत.रुग्णालयावीषयी कायम एक प्रकारचे सुप्त आकर्षण आमच्य मनात राहिले आहे.लहानपणापासुन वर्षाकाठी एका दिवसाच्या सर्दीतापा व्यतीरीक्तकसलेही आजारपण नसणार्‍या आमच्यासरख्यासाठी रुग्णालयाचे आकर्षण वीचीत्र वाटलॆ तरी अस्वाभवीक नाही.
आप्तजन आपली काळजी घॆतायतात हि भावनाही सुखकारक असते.
फ़ेब्रुवारीच्या ६ तारीखला देवाने आमच्या ह्या इच्छेला तथास्तु  म्हटले आणि एका अपघाताचे निमित्त होऊन आम्ही गोव्यातील सरकारी इस्पितळात दाखल झालो.पहिले ४ दिवस बेशुद्धीतच गेले.नंतर मात्र हळुह्ळु परीस्थितीचे भान येऊ लागले.इथे बराच काळ मुक्काम असणार हे ही लक्षात आल.नेहमीच्या सवयीप्रमाणे आमचा जनसंपर्क सुरु झाला.
खाजगी रुग्णालयात सहसा न येणारे अनुभव सरकारी रुग्णालयात येतात.लोक अनुभव मिळवण्यासाठी प्रवास करतात.मला एका ठिकाणी बसुन इतके अनुभव मिळाले.
दुनियामे कितने गम है।मेरा गम कितना कम है। या ओळिंचा अर्थ इथेच खरा कळतो.प्रत्येक बेड एक स्वतंत्र कथा असते.या ४ महिन्याच्या वास्तव्यात मी अशा अनेक कथा अनुभवल्या. मानवी स्वभावाचेअनेकवीध कंगोरे समजले.
सर्वच काहि करुण किंवा दुःखी नव्ह्ते.काही विनोदी,romamtic सुध्दा होते.खर म्हणजे भरताच्या नाट्यशास्त्रातील सर्व रस मला इथे दिसले.
आगामी काहि लेखामधुन असेच काही अनुभव आपणा सर्वांबरोबर share करायच ठरवल आहे.बघु कस जमतय ते.
कार्य सिध्दिस नेण्यास श्री समर्थ आहेतच.आपले मार्गदर्शनही प्रार्थनिय आहे.
शुभम भवतु।

प्रथम तुला वंदीतो

गणाधिश जो ईश सर्वा गुणांचा ॥

मुळारंभ आरंभ तो र्निगूणाचा ॥

नमु शारदा मुळ चत्वार वाचा ॥

गमु पंथ आनंद या राघवाचा ॥