बरेच दिवसांनी…..

खरच आहे .नविन संकल्प करण सोप आहे.पण सातत्य टिकवण महाकठिण. आळ्शीपणा झाकण्यासाठी मग कारणही भरपूर असतात.ती कारण सांगण्यासाठि तरी पोस्ट लिहावा.म्हणून आज सुरवात केली.माझा पाय बरा होता होता रहिल्यामुळे मला मुंबईला प्रस्थान करणे भाग पडले.नविन डॊक्टरांकडे प्रथमपासुन ट्रिट्मेंट्ला प्रारंभ झाला.या अस्थिसंसर्गाने फार त्रास दिला .गेल वर्ष सव्वा वर्ष आजारपणात गेल.अजून किमान ६ महिने जातील असा डॉक्टरांचा कयास आहे.शारीरिक व्याधीचि काळजी डॉक्टर घेतील.पण मानसीक आरोग्य टिकवण व डिप्रेशन येवू न देण हे माझ मलाच कराव लागणार आहे.

त्यासाठी रिकामा वेळ सत्कारणी लावण्याचे मार्ग शोधतोय.खर तर रिकामा वेळ्च राहु नये म्हणुन प्रयत्न करतोय कारण म्ह्ट्लच आहे.’ empty mind is devils workshop’ .रिकाम राहील तर भलभलते विचार मनात येतात.भविष्याची चिन्ता मन पोखरुन काढते.या सगळ्याचा उपयोग काही नाही. मधले काही दिवस फार कंटाळ्वाणे गेले.संदिप खरेच्या ’कंटाळ्याचाही आता कंटाळा येतो’ या कवितेचा अनुभव पुरेपूर घेतला.आता मात्र या सगळ्यातुन बाहेर पडायचे ठरवले आहे. हि पोस्ट हा त्यातलाच एक प्रयत्न. बघु कस जमतय ते.

Advertisements